शिवसेनेचे नवनाथ जगताप यांच्या गावभेटीला सुरवात ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा दि. २७ : शहाजी कोकाटे 

 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत डोंजा जि.प. गटातुन शिवसेनेचे पै. नवनाथ जगताप यांच्या मातोश्री अविदाबाई भागवत जगताप यांची उमेदवारी निश्चीत झाली असून अगोदरच कुंभेजा येथुन गाव भेटीला सुरू केलेल्या प्रचारात मोठा प्रतिसाद दिसुन येत आहे.
         तालुक्यातील जिल्हा परिषद डोंजा गटामध्ये जवळपास १८ गावांचा समावेश असून २२ हजार ३७६ मतदार आहेत. यामध्ये पुरूष ११ हजार ९४४ तर १० हजार ४३२ स्त्री मतदार आहेत. पुर्वीपासुनच जनसंपर्कात असणारे नवनाथ जगताप यांनी शिवसेनेच्या उमेदवार व त्यांच्या मातोश्री अविदाबाई जगताप या डोंजा जि.प. गटातून प्रबळ दावेदार माणल्या जाणाऱ्या यांच्या प्रचारार्थ गाव भेटी घेऊन नवनाथ जगताप यांनी सहकार्यासह प्रचाराची जोरात सुरवात केली आहे.
       मागील सन २०१७ च्या जि.प. निवडणुकीत अविदाबाई जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार होत्या. त्यांना ५ हजार ६०२ मते मिळाली होती. त्या १ हजार ४३७ मतांनी विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नवनाथ जगताप यांच्या मातोश्री यांना शिवसेना पक्षाने डोंजा जि.प. गट गतविजयी उमेदवार यांना उमेदवारी देऊ केली आहे. विजयाचे सातत्य राखण्यासाठी आता पुन्हा नवनाथ जाताप यांनी आता गाव भेटी घेण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.
 
Top