पंचायत समिती अणदूर गणातुन रणवीर सुनिल चव्हाण यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल 

तुळजापूर,दि.२१:

तुळजापूर पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि.२१ जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी अणदुर गणातुन भारतीय जनता पार्टीकडून रणवीर सुनिल चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे  दाखल केले आहे.

 अणदूर पंचायत समिती गणात अणदूर व  धनगरवाडी - चव्हाणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा समावेश असुन ११ हजार ०४ मतादाराची संख्या आहे. तुळजापूर तालुक्याचे भाजपचे नेते सुनिल चव्हाण यांचे रणवीर चव्हाण हे सुपूत्र असुन या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानले जात असल्याची चर्चा मतदार रंगली आहे. 

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना रणवीर चव्हाण समवेत आरळे भीमराव गुरप्पा, सुदर्शन मोकाशे, जाधव नारायण आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top