प्रा. डॉ. मिर्झा हाशमबेग यांची दक्खिनी बोली  भाषेचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड

नळदुर्ग,दि.२१: प्रा.डॉ. दिपक जगदाळे 

 महाराष्ट्रातील  36 जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाच्या व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने  "बोलींचा जागर" या विशेष कार्यक्रमाचे राज्यस्तरावर शासनातर्फे आयोजन केले जात आहे. त्यामागे महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलल्या जाणाऱ्या विविध बोली भाषांचे संवर्धन व संरक्षण करणे हा प्रमुख उद्देश आहे. 

या कार्यक्रमात नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. हाशमबेग मिर्झा यांची  महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगना सीमा लगतच्या भागात बोलल्या जाणाऱ्या दक्किनी या बोली भाषेचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. प्रा. डॉ. हाशमबेग मिर्झा हे महाविद्यालयात मागील 27 वर्षापासून कार्यरत असून त्यांनी दक्किनी बोली भाषेवर यूजीसी दिल्लीचे चार संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून त्यांचे मागील 27 वर्षात 23 ग्रंथ व शंभर पेक्षा अधिक शोध लेखही प्रकाशित झाले आहेत.

 त्यांच्या या  निवडीबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , संस्थेचे सचिव उल्हास  बोरगावकर , सदस्य बाबुराव चव्हाण, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, संस्थेचे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. अशोक कदम यांच्यासह महाविद्यालयातील  कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
 
Top