नंदगाव जि. प. गटाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांच्या प्रचार रॅली व कोपरा बैठकीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि. प. गटाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार रॅली मतदार संघात काढून कोपरा बैठक घेण्यात आली. त्यास ग्रामस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
नंदगाव जिल्हा परिषद गटाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांच्या प्रचारार्थ शनिवार रोजी सिंदगाव, खुदावाडी, बोळेगाव, आदीसह मतदार संघात प्रचार रॅली, कोपरा बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी नळदुर्ग नगरपालिकेचे भाजप नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक तथा सभापती शशिकांत पुदाले, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, किशोर नळदुर्गकर, नंदगावचे सरपंच शशिकांत नागिले, सलगरा मड्डी सरपंच जनार्धन चव्हाण, बोरगावचे उपसरपंच लक्ष्मण पाटील, सतीश काटे कमलाकर तुपे शिवाजी काटे मल्लिनाथ गुड्डे राजेंद्र तुपे प्रशांत करंडे मोहन मोरे धनराज कलशेट्टी सरपंच विलास पाटील महादेव सालगे आदी भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.
परिसरातील नागरिकांनी दिलेला प्रचंड, उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण प्रतिसाद महायुतीच्या विकासनिष्ठ धोरणांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दर्शवणारा ठरत आहे. गावागावांतून मिळणारा जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद पाहता या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांचा विजय निश्चित मानले जात आहे . महायुतीच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन उभे करण्याचा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.