जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारात भाजप महायुतीची जोरदार मुसंडी ;  

ग्रामीण भागाचे रुपडे पालटण्यासाठी निवडणूक रिंगणात - उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे 


नळदुर्ग,दि.०२ फेब्रुवारी:

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत  जनमताचा कौल भाजप महायुतीकडे वाढत असल्याचे पाहुन विरोधक धास्तावले असुन त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करुन दिशाभूल  करीत असल्याचे कारस्थान सुरू असुन त्यास मतदारानी बळी पडू नये, असे सांगत मतदार त्यांना  त्यांची योग्य जागा  दाखवणार  असल्याचे नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजप रिपाइं (आठवले),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिव सेना (एकनाथ शिंदे).व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे  यांनी बोलताना सांगितले.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामीण भागाचा विकासात्मक कायापालट करण्याकरिता आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी  नंदगाव (ता.तुळजापूर )  जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.

नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर कोरे, नंदगाव जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती खुदावाडी गणातील उमेदवार भिवाजी इंगोले   यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गावे पिंजुन काढत मतदारांना आपली बाजू पटवुन सांगत आहेत. नुकतीच खुदावाडी येथे  कॉर्नर सभा घेण्यात  आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला . या बैठकीस नळदुर्गचे नगराध्यक्ष  बसवराज धरणे, माजी पंचायत समिती सदस्य  महादेव सालगे, खुदावाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ब्रम्हनंद कापसे , भिमाशंकर कबाडे , खुदावाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार भिवाजी इंगोले ,रिपाइं चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड ,भाजपा मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष किशोर धुमाळ, पत्रकार निजाम शेख, अंगद जाधव,  लक्ष्मन राठोड, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजी मारेकर आदीसह नंदगाव जिल्हा परिषद गटातील आणि गणातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.  

 
Top