तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावास गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी भेट देत घेतली माहिती जाणून 

जळकोट,दि.२८:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत चालू असलेल्या कामाची पाहणी केली.


ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तिच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन तिची कार्यक्षमता वाढविण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवित‌ आहे.आलियाबाद ग्रामपंचायत या अभियानात सहभागी असल्यामुळे आज तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, विस्तार अधिकारी ए.सी.कावळे यांनी भेट देऊन पाहणी केली व काही सुचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण,माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष नाईक, माणिक राठोड,शिवाजी चव्हाण, व्यंकट राठोड,हरीदास राठोड, सुभाष चव्हाण, राजाराम पवार, संदीप राठोड, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top