बोरमन तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जळकोट,दि.२८:
तुळजापूर तालुक्यातील बोरमन तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम जळकोट येथील वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक जळकोट ते बोरमन तांडा पर्यंत काढण्यात आली. येथील शिवाजी चौकात मिरवणूक आल्यानंतर संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आषारुढ पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, श्रीनिवास पाटील, शिवजन्मोत्स मंडळाचे विठू कदम,शकंर वाडीकर,जितू पाटील, संतोष वाघमारे, संजय अंगुले, सुनील माने,अरुण लोखंडे, महेश कदम,कृष्णात मोरे, व्यंकट बारदाने, नागराज जाधव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी पारंपरिक वेशभूषात बंजारा महिलांनी व युवकांनी बंजारा गीतावर जयघोष करत नृत्य सादर केले.
यावेळी ,राजु चव्हाण, मोहन राठोड,अनिल राठोड, तानाजी चव्हाण,राजु भिका राठोड, भिमराव राठोड वसंत चव्हाण प्रदिप राठोड,राजु राठोड,बंडू चव्हाण, महादेव राठोड, नंदकुमार चव्हाण,आर.बी. टेलर, सुर्यकांत राठोड,आकाश राठोड,लहू चव्हाण यांच्या सह महिला,पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.