बालाघाट महाविद्यालयात हुतात्मा बाबुराव बोरगांवकर , हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन

नळदुर्ग,दि.१८:  प्रा. दिपक जगदाळे

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हुतात्मा दिनाचे औचित्य साधून हुतात्मा बाबुराव बोरगांवकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव उल्हास  बोरगांवकर , कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, हुतात्मा नातू निलय्या स्वामी, सौ. रोहिणीताई बोरगांवकर यांनी हुतात्म्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
या कार्यक्रमास  नगराध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे, शिवाजी व-हाडे
,सुभाष कोरे, दयानंद स्वामी, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, माजी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. प्रविण भाले, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ.मनोज झाडे, डॉ. अशोक कदम, डॉ. एन.बी. जाधव, डॉ. एस.बी. पाटील, डॉ. एच. के. जाधव, डॉ. निलेश शेरे, डॉ. शिवाजी जेठीथोर, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुभद्राताई मुळे, नगरसेवक प्रविण गायकवाड, नगरसेविका राणी सुरवसे, कल्पना गायकवाड, यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
 
Top