नळदुर्ग : शिवजयंती निमित्त पाळणा व दुग्धअभिषेक सोहळयाचे आयोजन

नळदुर्ग,दि.१६: 

हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नळदुर्ग येथील माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी  दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव पाळणा व दुग्धअभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

नळदुर्ग शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी शहरातील असंख्य महिला भगिनी यांच्या उपस्थितीत शिव जन्म पाळणा केला जातो. यानंतर नळदुर्ग शहरातील मान्यवरांच्या हस्ते दुग्धअभिषेक सोहळा संपन्न होतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक घराघरात साजरी झाली पाहिजे, या हेतूने विनायक अहंकारी यांनी सुरु केलेला हा घरगुती जन्मोत्सव आज त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत शिवप्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विनायक अहंकारी यांनी केले आहे.
 
Top