नळदुर्ग येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदारसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

नळदुर्ग,दि.१६ :

क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती 
फटाक्यांच्या अतिष‌बाजीने  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील वसंतराव नाईक गोलाई चौकात सकाळी साडे दहा वाजता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराज की जय, असा जोरदार जयघोष दुमदुमला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडले. यावेळी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,  उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, रवी महाराज राठोड, प.स.सदस्य भिवा इंगोले व प्रमुख बंजारा बांधव यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

 नगरसेवक निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड , धिमाजी घुगे, वैभव जाधव,  नायक फुलचंद राठोड, कारभारी विनायक जाधव ,  विद्यानंद राठोड,  जेष्ठ नागरिक मानसिंग राठोड, भानुदास राठोड, अँड प्रवीण पवार, किरण राठोड, दत्ता राठोड, गणेश राठोड, संजय जाधव,  कैलास चव्हाण, सुरेश राठोड,विनायक जाधव, सरपंच सुर्यकांत चव्हाण, माजी सरपंच बालाजी राठोड, सुरेश राठोड, शिवाजी राठोड, विनायक राठोड,  सचिन राठोड यांच्या सह  विविध तांडयातील प्रमुख नाईक, कारभारी,बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🪷बसवराज धरणे ,नगराध्यक्ष नळदुर्ग🪷 
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली याठिकाणी करण्यात येत असलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी प्रथम प्राधान्य देणार.
♦️प्रकाश चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य♦️

संत सेवालाल महाराज हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान होते त्यांनी आयुष्यभर समाजसेवा, त्याग आणि मानवतेचा संदेश दिला तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शिक्षणत एकता व प्रगतीसाठी प्रयत्न केले.युवकानी त्यांच्या कार्याचा कीआदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात काम करावे असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले.

 
Top