शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर राठोड तर उपाध्यक्षपदी श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले यांची निवड 

नळदुर्ग, दि.१४:

नळदुर्ग शहरातील वसंतनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शालेय व्यवस्थापन समितीची  सन 2026-28 ची नुतन  पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.त्यानुसार अध्यक्षपदी सुधाकर राठोड तर उपाध्यक्षपदी श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले यांची निवड करण्यात आली.

शनिवार दि.१४ फेब्रुवारी रोजी लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व  रवि (महाराज) राठोड , 
किसन वसाराम राठोड,  ज्योतिबा तिबोले, श्रीमती प्रीती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होवून पुढील पदाधिकारीची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष सुधाकर माणिक राठोड ,उपाध्यक्ष श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले , सदस्य  चव्हाण आकाश सूर्यकांत,  कोळी संतोष चित्तू , राठोड विशाल विजयसिंह, हणमंत तिम्मा पवार, सौ.रंजना बालाजी पवार, सौ. प्रियंका वसंत हटकर, सौ.प्रियंका सतीश राठोड, सौ.मनीषा नेताजी जाधव, सौ.रेश्मा लक्ष्मण जाधव, सौ.मीना दत्ता राठोड, शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून किसन वसाराम राठोड ,मुख्याध्यापक सुरवसे एच.एम,
सहशिक्षक  जाधव वाय. टी,  भोसले यु.बी., 
राठोड ए.एस. श्रीम.कुंभलकर एन एन, श्रीम. राठोड आर.एस.आदी. यावेळी नागरिकांच्या वतीने नुतन पदाधिकारीचे सत्कार करण्यात आले.
 
Top