श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील  एनएसएस विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात

मुरुम,दि.२२:

ग्रामीण भागातील पाणलोट व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या विकासासाठी युवकांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मौजे व्हंताळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात शुभारंभ शनिवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला. 


“पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमिनीच्या शाश्वत विकासासाठी युवक” हे ब्रीद घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोदकुमार वायचळ यांच्या हस्ते झाले.‌ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. यावेळी लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री. महावीर जाधव, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, सरपंच श्री माधव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विनोद कुमार वायचळ यांनी जलसंवर्धन, मृदसंवर्धन व पर्यावरण रक्षण या बाबी आजच्या काळात अत्यंत आवश्यक असून युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून या क्षेत्रात योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. पाणलोट व्यवस्थापनामुळे शेती, पाणी व ग्रामीण जीवनमानात सकारात्मक बदल घडून येतो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी  युवकांनी समाजहिताची जाणीव ठेवून शिस्तबद्ध व सकारात्मक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण व सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले.
या शिबिराच्या कालावधीत घेण्यात येणारे उपक्रमाबद्दलची माहिती कार्यक्रमाधिकारी डॉ. भरत शेळके यांनी प्रास्ताविकात दिली. स्वयंसेवकांकडून श्रमदान, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, जलसंधारणाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार त्यांनी सांगितले.

याप्रसंगी व्हंताळ येथील उपसरपंच विजय सगर,  रविंद्र जगताप, विठ्ठल जाधव, महेश पाटील, राजाभाऊ पाटील, नंदकुमार जाधव,
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भरत शेळके, डॉ. अनिल देशमुख, प्रा. मुरलीधर जाधव, , डॉ. अतुल बिराजदार, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. महेश जोशी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top