शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी तर उपाध्यक्ष संदीप गायकवाड/ओंकार कदम

उत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग,दि.२६:

 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी तर उपाध्यक्ष संदीप गायकवाड, ओंकार कदम, कोषाध्यक्ष संतोष पुदाले सांस्कृतिक प्रमुख परमेश्वर जाधव,सल्लागार शरद बागल,सरदारसिंग ठाकूर,राजू वैद्य, मिरवणूक प्रमुख अमित शेंडगे, शाम कणकधर, प्रविण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

 दि-04 मार्च रोजी लोकमान्य वाचनालय येथून दुपारी-04 वा."भव्य शोभा यात्रा (प्रमुख आकर्षण- तीनही महापुरुषांसारखी वेशभूषा धारण केलेले घोड्यावरील बाल,,शिव-बसव-राणा)" , शहरातील सर्व मान्यवर व हिंदू बांधव- माता-भगिनीं यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा स्थापना ,दि-06 मार्च रोजी "कृष्णाई उळेकर यांचा भव्य पोवाडा-भारूड-व लोकगीताचा कार्यक्रम"दि-07 मार्च रोजी "भव्य-दिव्य मिरवणूक (प्रमुख आकर्षण-महाकाल,,अघोरी नृत्य,शिवतांडव,भस्म आरती)होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top