नळदुर्ग,दि.२८: डॉ. दिपक जगदाळे
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवार दि.२८ फेब्रुवारी रोजी नोबेल पुरस्कार विजेते चंद्रशेखर व्यंकट रमण ( सि. व्हि. रमण ) यांचा सन्मान दिवस म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सि. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड उपप्राचार्य डॉ अशोक कदम डॉ. हंसराज जाधव, डॉ. समीर पाटील, डॉ. एन. बी. जाधव, डॉ. शिवाजी घोडके, डॉ उद्धव भाले, डॉ. रोहिणी महिंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ अशोक कदम , डॉ रोहिणी महिंद्रकर, प्रा. धनंजय चौधरी,प्रा. बाळू दराडे यांनी विज्ञानाची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार डॉ एन. बी. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.