नळदुर्ग शहरातील सय्यद हसन -हुसैन जुळी भावंडाचा पहिला रोजा संपन्न 

नळदुर्ग,दि.२७:

 मुस्लिम धर्मियाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ मानला जातो. या महिन्यात  रोजे (उपवास) करतात. लहानापासुन ते मोठ्यापर्यत या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे धरत असतात.

नळदुर्ग शहरातील दोन जुळी भावंडे व एक बहीण अश्या तिन्ही चिमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा एकही कण व पाण्याचा एकही थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पुर्ण केला. शहरातील प्रतिष्ठित नागरिक  अँड सय्यद कैसरअली जाहगीरदार यांची दोन जुळी मुले हसन अली (वय ५) व हुसैन अली(५) व त्यांची बहीण तोयबा (वय ७) यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याने त्यांचे
सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी  सर्व लोकांच्या सुख- समृद्धी, शांतीसाठी चिमुकल्यानी  प्रार्थना केली.
 
Top