नळदुर्ग नगरपालिका अंदाजपत्रकावरुन
विरोधक जाणून बुजून जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत - नगराध्यक्ष बसवराज धरणे
नळदुर्ग,दि.२७ :
नळदुर्ग नगरपालिकेच्या अंदाज पत्रकावर विरोधकानी कसलाच अभ्यास न करता फक्त जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले.
गुरुवार दि.२६ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग नगरपालिकेचा सन २०२६ -२०२७ चा अंदाजपत्रक सादर नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले . यावेळी या अंदाजपत्रकास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवत सदरील अंदाजपत्रक स्थायी समितीत न मांडता ते थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप करत नियमबाह्य मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रक रद्द करावे व
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, अशी मागणी केली.
याप्रकरणी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले की, सदरील अंदाजपत्रकाबाबत पूर्ण अभ्यास न करता विरोधकांनी विरोधाला विरोध करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचे वाटते. मुळात आर्थिक अंदाजपत्रक हे 15 डिसेंबर पूर्वी स्थायी समिती समोर सादर होणे गरजेचे असते. पण आपली स्थायी समिती त्यावेळेस अजून निर्माण झाली नव्हती. त्यामुळे स्थायी समितीने 31जानेवारीपूर्वी अंदाजपत्रक सादर न केल्यास नगराध्यक्ष विशेष अधिकाराचा वापर करुन आर्थिक अंदाजपत्रक सादर करता येते. म्हणून कोणताही बहुमताचा वापर न करता जे कायद्यात बसेल, त्याप्रमाणे केले आहे.
म्हणून विरोधकांना माझी विनंती की सतत राजकारण करू नका.विकासाच्या मुदयावर बोला.जनतेत गैरसमज निर्माण करू नये.असेही सांगितले.