घनकच-याचे टेंडर रद्द करुन नविन निविदा काढावी ; अन्यथा  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा काँग्रेस नगरसेवकांचा  नळदुर्ग नगरपालिकेस इशारा 

नळदुर्ग,दि.११:

घनकचरा निर्मुलनाचे कार्य केले जात नसल्यामुळे टेंडर धारकाचे टेंडर रद्द करुन नविन निविदा काढण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्याकडे मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की, घनकचरा निर्मुलनाचे कार्य दोन महिन्यापासून शहरात टेंडर धारक कंपनी करीत नाही. या मुळे शहरातील गटार तुंबले आहेत. व नागरीकांच्या प्रचंड तक्रारी येत आहेत, शहरातील शास्त्री चौक, हत्ती गल्ली, जय भवानी चौक, ब्राम्हण गल्ली, सावरकर चौक, संभाजी चौक, बेडगे गल्ली, पाचपीर, नॅशनल शाळा, नळदुर्ग पोलीस ठाणे , चावडी चौक, कुरेशी गल्ली, इंदिरानगर, व्यासनगर, रहिमनगर, डि एड कॉलेज, रामलिला नगर, व्यंकटेशनगर, ठाकरेनगर, येथे सफाई कामगार जात नाहीत, त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दुर्गधी पसरली जात आहे,  जंतुनाशक औषध  फवारणी  केली जात नाही, यामुळे शहरात विविध साथीचे आजार पसरत आहेत. व नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

 घणकचरा टेंडर  घेणारी कंपनी शहराच्या प्रत्येक प्रभागानुसार कामगार लावत नाही, तर फक्त २५ महिला कामगार, ७ ड्रायव्हर ५ गाडवरच गेले दोन महिने काम चालु आहे. तसेच नगरपालिकेकडून जादा मजुर दाखवुन पैसे उकळून  फसवणुक केली जात आहे, ज्या भागात तक्रार येते तेथे दोन तीन तात्पुरते मजुर एक दोन तास पाठवुन काम करीत असल्याचे दाखवत आहे, ही नगरपालिकेची व जनतेची पुसवणुक असुन सदर कंपनी भ्रष्टाचार करीत असल्याने त्वरीत टेंडर रद्द करुन नवीन टेंडर काढावे. अन्यथा आम्हाला जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे नगरपालिकेतील  काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक अकाश कुलकर्णी ,सुधीर पोतदार, गायकवाड कमल यांनी दिला आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top