जनतेनी केलेल्या विकास कामाची पोहच म्हणून निवडणुकीत दिली पहिली पसंती -
भाजपचे नुतन जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर अण्णा कोरे
नळदुर्ग,दि.११ :
नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजप महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांनी त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी उबाठाचे सुर्यकांत आरबळे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. कोरे यांना ७ हजार ४४६ मते मिळाली तर आरबळे यांना ५ हजार ४१८ मते मिळाली आहे. निवडणुकीत विजयी झाल्याने कोरे यांच्या समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण करत, फटाक्याची अतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गट आणि दोन्ही भाजप महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामांवर निवडणूक लढवुन दणदणीत विजय मिळविला आहे. याच गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती नंदगाव गणातून भाजपाच्या सौ. रोहिणी विवेकानंद मेलगिरी तर खुदावाडी गणातून भाजपाचे भिवाजी इंगुले यांचाही विजय झाला आहे. या निवडणुकीत नंदगाव गट आणि गणातील भाजपाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाबद्दल नंदगाव येथे कोरे यांचा जेसीबीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, जयघोष करत मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सिद्धेश्वर अण्णा कोरे यांचा कार्यकर्त्यासह नंदगाव गावचे सरपंच शशिकांत नागिले यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचबरोबर नळदुर्ग शहरात रिपाइंसह भाजपा महायुतीच्या वागदरी, येडोळा, लोहगाव नळदुर्ग शहरातील कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात जंगी स्वागत करून विजय उमेदवारांचा सत्कार केला.
भाजपचे नुतन जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर अण्णा कोरे
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विकास कामाची जनतेनी मतदानरुपी आशिर्वाद दिले आहे. यापुढेही जनतेची सेवा करत विकास कामांच्या माध्यमातून नंदगाव गट मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार.