जळकोट पंचायत समिती गणातून  भाजप महायुतीचे  अँड आशिष गणेशराव सोनटक्के यांचा मोठ्या मताधिक्याने विजय ;  विजयी मिरवणूक जल्लोषात 

नळदुर्ग,दि.११: 

जळकोट (ता.तुळजापूर ) पंचायत समिती गणातून तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , भाजप महायुतीचे उमेदवार अँड आशिष गणेश सोनटक्के यांनी १ हजार ५०० मताच्या फरकाने दणदणीत विजय  मिळवत विरोधकांचा पराभव केला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

गणेश सोनटक्के आणि त्यांचे पुत्र अँड आशिष सोनटक्के यांनी सामाजिक कार्य सतत सुरू ठेवल्याने त्यांचा जनतेशी नाळ जुळलेली असल्याचे सर्वश्रुत आहे.जळकोट पंचायत समिती मतदार संघातील या निवडणुकीकडे तुळजापूर तालुक्याचे  लक्ष वेधले होते.  जळकोट पंचायत समिती गणात काँग्रेस व भाजपा अशी चुरशीची लढत रंगली होती. या लढतीत भाजप महायुतीचे  अँड आशिष सोनटक्के यांनी काँग्रेसचे मोहन चव्हाण यांचा  १ हजार ५०० मताधिक्यानी पराभव केला. जळकोट पंचायत समिती मतदार संघात आशिष सोनटक्के यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्याप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनील चव्हाण तसेच युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली  आशिष सोनटक्के यांनी शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रचार केला.

जनसामान्याशी सतत संपर्कात असल्याने आणि विकासाकरिता प्रयत्नशिल , कामाची तत्परता यामुळेच अँड आशिष सोनटक्के यांना फायदा झाला. विजयनंतर जळकोट गावातून जंगी विजयी मिरवणूक काढत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला . यावेळी असंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

ॲड आशिष सोनटक्के यांनी तुळजापूर कृषी उत्त्प्न बाजार समितीचे सभापती म्हणुन उल्लेखनीय कार्य केले आहे. या कृषी उत्पन्न 
बाजार समितीचा राज्यात १९ वा तर लातुर विभागात ३ रा व धाराशिव जिल्हयात पहिला क्रमांक मिळाले आहे. त्यामुळे या बाजार समितीची भारतीय राष्ट्रीय बाजारात उल्लेख्निय नोंद झाली आहे.

 
Top