आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक  श्री व सौ.मनीषा गुंडू पवार या शेतकरी दाम्पत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते गौरव 

नळदुर्ग, दि.२५ :

तुळजाभवानी कृषी महोत्सवात नळदुर्ग (आलियाबाद शिवार) येथिल आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक  गुंडू पवार व सौ.मनीषा गुंडू पवार या शेतकरी दाम्पत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते गौरव करण्यात आला.त्याबद्दल पवार दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव धाराशिव 2026 तुळजापूर या ठिकाणी जिल्ह्यातील सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करीत असलेल्या नळदुर्ग आलियाबाद येथील आदर्श अंबा बागायतदार शेतकरी श्री गुंडू रंगराव पवार व मनिषा गुंडू पवार व उस्मानाबादी शेळीपालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना व  तरुण शेतकरी वर्गांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि उस्मानाबादी शेळीचे नाव पूर्ण भारतभर नावलौकिक करून दिल्याबद्दल आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 यावेळी जिल्हा कृषी अधिकारी श्री राजकुमार तुकाराम मोरे, तालुका कृषी अधिकारी श्री सत्यजित देशमुख , जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे  , पंचायत समिती सदस्य भैय्या रोचकरी,  कृषी सहाय्यक श्री संतोष माने , इतर अधिकारी व लोक प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Top