प्रशासकीय कालावधीतील  अनेक विकासकामे  दिर्घ काळापासुन रखडत पडल्याने मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय ; नळदुर्ग नगरपालिकेची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी 


नळदुर्ग,दि.११:

नगरपालिका अतंर्गत करण्यात येणारे अनेक विकासकामे दिर्घकाळ पासुन रखडत पडलेली असल्याचे दिसून येत आहे.तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून न.प.चे लेखा परिक्षण झाले नसल्याचे उघडकीस आले असुन प्रशासकीय कालावधीत मोठा अनागोंदी कारभार झाल्याने विशेष बाब म्हणून नळदुर्ग न.प.ची प्रशासकीय कालावधीतील संपूर्ण कामकाजाची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

नळदुर्ग नगरपालिकेच्या विविध योजनेतून असंख्य कामे मागील दोन वर्षांपासून रखडली आहेत. यामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नाली, ओपन स्पेस विकसित करणे व सभागृह आदी विकास कामांचा समावेश आहे. धक्कादायक बाब ऐवढी कामे रखडलेली असताना, जागा उपलब्ध नसल्याने किंवा वाद उद्भवल्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसताना पालिका प्रशासनाकडून नवीन कामांचा घाट घातला जात आहे. रखडलेली ही सर्व कामे प्रशासन काळातील आहेत. मात्र आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर मागील कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना निधी परत जाण्याच्या भीतीपोटी आठ महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया झालेली कामे सुरू करण्याची तयारी केली जात आहे मात्र दोन वर्षांपूर्वीच्या कामाचे काय असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट रोडचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, माऊली नगर येथील ओपन स्पेस जागा, अपर तहसील कार्यालय येथील पाणी टाकी, शास्त्री चौक येथील सिमेंट रस्ता इंदिरानगर येथील सिमेंट रस्ता अशी असंख्य मंजूर कामे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
रखडलेल्या कामांमध्ये व्यंकटेश नगर ,  आण्णाप्पा नगर, माऊली नगर येथील ओपन स्पेस विकसित करणे या कामांचा समावेश असून बहुतांशी कामाचा कार्यारंभ आदेश १२ मार्च २०२४ रोजी देण्यात आला. या कामाची मुदत १८० दिवसाची होती मात्र वर्षभरानंतरही फक्त संरक्षक भिंतीचे काम दिसत आहे तेही अपूर्ण अवस्थेत करण्यात आहे. यातील बहुतांशी कामाच्या ठिकाणी कामाची माहिती असलेला फलक  लावण्यात आलेला नाही. तसेच मुस्लिम समाजासाठी असलेला शादीखाना, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मारक, इंदिरानगर येथील रस्ते व नाली, भवानी नगर येथील बाळकृष्ण मंदिर जवळील सभागृह, चर्मकार समाजाचे सभागृह, बुद्ध विहार सभागृह, मारुती मंदिर इंदिरानगर सभागृह, विविध प्रभागातील रस्ते व नाली कामेही रखडलेली आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top