"आपलं घर"च्या अनाथ बालकांना साखरेचे हार वाटप करून राजेंद्र महाबोले यांनी केला गुढीपाडवा साजरा 

नळदुर्ग,दि.२२:

नळदुर्ग येथील नाभिक समाजाचे नेते व व्यापारी राजेंद्र महाबोले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने नळदुर्ग येथील "आपलं घरं " या निवासी शाळेतील मुलांना साखरेचे हार वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करतात.
 यावर्षीही हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने पार पाडला.. राजेंद्र महाबोले यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई महाबोले यांच्या हस्ते व नळदुर्ग नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती तानाजी जाधव व नगरसेविका सौ. राणीताई शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आपलं घरं येथील मुलांनी स्वागत गीत गायले. याप्रसंगी नगरसेवक तानाजी जाधव व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मनोगतातून या कार्यक्रमाचे कौतुक केले.

यावेळी विकास सोसायटीचे सदस्य रघुनाथ नागणे.. निवृत्त शिक्षक सुभाष महाबोले, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,दिशा नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव, ओंकार महाबोले,आकाश सुरवसे,लखन महाबोले,विशाल सुरवसे आदी उपस्थित होते..
 
Top