बोरी नदीच्या तिरावर उभारणार भव्य ध्यान मंदिर ; नळदुर्ग,अणदूर परिवाराच्या वतीने समर्थ प्रकट दीन उत्साहात साजरा
अणदूर,दि २२ :
समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट, नळदुर्ग, अणदूर परिवाराच्या वतीने नळदुर्ग येथे अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दीन नामस्मरण व ध्यानसाधना करून मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोरी नदीच्या काठावर भव्य ध्यानमंदिर उभारण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांनी केली. स्वामी समर्थ प्रकटदिनी नळदुर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
नळदुर्ग येथील नदीच्या तीरावर सीमा जोशी, गायत्री कुलकर्णी आणि मंजुषा जेवरीकर यांनी या ध्यान मंदिरासाठी जागा दिली असून,त्याच्या बाजूला समर्थ नगरी प्रतिष्ठाननेही जागा घेतली आहे..त्या जागेत हे ध्यान मंदिर उभारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला नळदुर्ग आणि अणदूर परिसरातून अनेक स्वामी भक्तांनी हजेरी लावली होती, त्यात महिलांची संख्या मोठी होती,त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे वस्त्र आणि प्रतिमा ठेवण्यात आलेली होती.
महिलांनी,भजन,तारकमंत्र,ध्यान,नामजप करून स्वामी महाराजांचा प्रकटदिन साजरा केला,राज्यभरामध्ये श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चेअरमन महेश इंगळे व स्वामीभक्त चोळप्पा महारांचे वंशज वे.शा.सं.अण्णू महाराज यांच्या,मार्गदर्शनाखाली,स्वामीभक्त भाविक स्वामीनामप्रसाराचे कार्य करत असतात.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्यासोबत अक्कलकोट येथून गणेश पाठक,सौ.सुखदा ग्रामोपाध्ये, राहुल वटकर , कावेरी धरणे यांच्यासह पत्रकार संजय जेवरीकर,कल्याण कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, जागा मालक शरद देशमुख हे उपस्थित होते.