प्रभू श्रीराम जयंती निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन 


धाराशिव,दि.२२:

भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिवच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर  यांच्या नेतृत्वामध्ये येत्या २६ तारखेला प्रभू श्रीरामांची जयंती जिल्ह्यामध्ये सर्वत्र भव्य शोभायात्रा आयोजित करून साजरी केली जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रभू श्रीराम नवमी निमित्त धाराशिव शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक व धार्मिक संस्था, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय तसेच डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था व विविध अध्यात्मिक संघटना यांनाही या पत्राद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

सदर शोभायात्रा सकाळी १० वाजता त्या त्या शहरातील प्रमुख चौकातून निघून त्या भागातील प्रभू श्रीराम मंदिरात किंवा तेथील प्रमुख मंदिरामध्ये विसर्जित होईल.
या शोभायात्रेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

                      
                   
 
 
Top