मुरुम रोटरीकडून बाजारकरुसाठी रस्त्यावर खास शुद्ध व थंडगार पाण्याची सोय; आठवडी बाजाराकरिता येणाऱ्या अबालवृद्धांकडून समाधान

मुरुम ,दि.२२: 

 येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून सध्या मोठ्या प्रमाणात हवेतील तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य रस्त्यावर खास रविवारी (ता. २२) रोजी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय करण्यात आली.

 या परिसरातील विविध गावातून बाजाराकरिता येणाऱ्या वाड्या-वस्तीवरील बाळ-गोपाळ, अबालवृद्ध व नागरिकांना तात्काळ पाणी मिळावे या हेतूने या सामाजिक उपक्रमाचा तथा पाणपोईचा शुभारंभ महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे संचालक अमृत वरनाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, उपप्राचार्य कल्लय्या स्वामी, रोटरीचे सचिव कल्लाप्पा पाटील, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संतोष कांबळे, खुणे गुरुजी आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना रोटरी सदस्यांकडून पाणी वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाची सोय मार्च-मे या तीन महिन्याच्या आठवडी बाजारादिवशी करण्यात येणार असल्याचे रोटरीचे सदस्य प्रकाश रोडगे यांनी यावेळी सांगितले. रोटरीकडून पाणपोई या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.
 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील बाजार रस्त्यावर रोटरीकडून पाणपोईचे उद्घाटन अमृत वरनाळे करताना नितीन डागा, महेश मोटे, प्रकाश रोडगे व अन्य.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top