ऊसाचे थकित  बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा 

नळदुर्ग ,दि.२३:

वारंवार विनंत्या अर्ज करुनही शेतकऱ्यांचे
ऊसाचे थकित  बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात नळदुर्ग येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बुधवार दि.२५ मार्च रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हाधिका-याना देण्यात आला आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील आम्ही शेतकरी  सोमनाथ कसेकर,  सुनिल चौधरी,  अबेदतुल्ला इनामदार व मीनाक्षी तानाजी काळे असे आम्ही चौघे धोत्री येथील गोकुळ शुगर या साखर कारखान्यास सन २०२४-२०२५ व २०२६ या वर्षाचे ऊस बील थकीत आहे. तरी बील देण्याबाबत तुळजापूर तालुक्यातील अनेक  शेतकऱ्यानी ऊस गाळपासाठी दिला होता. तरी त्यांचे ऊसाचे बील यापूर्वी दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप बील मिळाले नाही. सातत्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार व फोनवर संपर्क करुन कारखानदार व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करुन देखील अद्याप बील मिळाले नाही.  दवाखाना, लग्न कार्ये व अनेक अडचणी व समस्या असल्यामुळे शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती  आहे. तरी  थकीत बील  त्वरित देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावे अन्यथा ऊस बील न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांच्यावतीने  सोमनाथ गुरुलिंगप्पा कसेकर , सुनिल सुरेश चौधरी  स्वप्निल तानाजी काळे , अबेदतुल्ला इनामदार असे आम्ही शेतकरी दि. २५.३.२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे. यांची एक प्रत  माहितीस्तव , आमदार राणाजगजितसिंह पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसुल साहाय्यक, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. धोत्री, जि. सोलापूर, साखर आयुक्त कार्यालय, सोलापूर, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींना देण्यात आले आहे.

 


 
Top