धाराशिव जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापतीपदी सिद्धेश्वर (आण्णा ) कोरे यांची वर्णी लावण्याची नागरिकांसह सर्मथकांची मागणी
नंदगाव, दि.२४ :
नंदगाव जि.प. गटातून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धेश्वर (आण्णा) बाजीराव कोरे यांनी दणदणीत विजयी मिळविले असुन त्यांची जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीपदी निवड करण्याची मागणी नंदगाव गटातील व परिसरातील नागरिकातुन केली जात आहे .
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर (अण्णा) कोरे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून कृषी विषयी त्यांना जाण आहे.त्याचबरोबर नंदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सर्वश्रुत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीची त्यांना जाणीव आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे.
त्यांनी यापूर्वी तुळजापूर पंचायत समिती सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांना जिल्हा परिषद कृषी विभाग सभापती म्हणून संधी दिली तर चांगल्या प्रकारे शेतकरी, शेतमजूरासह सर्वसामान्य जनतेची कामे करतील आणि त्याचा फायदा भविष्यात भाजप पक्षाला होणार आशी नागरिकांची धारणा आहे.तेंव्हा भाजपचा निस्वार्थी, निष्ठावंत कार्यकर्ता सिद्धेश्वर (अण्णा ) कोरे यांना जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपदी निवड करून काम करण्याची संधी द्यावी अशी मतदार संघातून कार्यकर्त्यासह त्यांच्या समर्थकांतुन मागणी होत आहे.