पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांचे निधन ; सामुदायिक श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन
अणदुर,दि.२४:
अणदुर ता.तुळजापूर येथिल जय मल्हार पत्रकार संघाचे सदस्य , निर्भीड व झुंजार पत्रकार, तसेच चन्नबसव सामाजिक संस्थेचे संस्थापक कै. शिवशंकर तिपण्णप्पा तिरगुळे यांचे दि.२३ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी सामुदायिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरगुळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लिहिणारा, समाजातील वंचित घटकांसाठी झटणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक संवेदनशील पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मारक सभागृह, अणदूर ता तुळजापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कै. शिवशंकर तिरगुळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.