नळदुर्ग नगरपालिकेस वार्षिक टेंडर प्रक्रियेतून मिळाले लाखाचे उत्पन्न ; वार्षिक टेंडरसाठी १३६ अर्जाच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद
नळदुर्ग, दि.२४ :
येथील नगरपालिकेच्या वार्षिक टेंडर अर्ज विक्री प्रक्रियेतून नगरपालिकेच्या तिजोरीत सुमारे ९५ हजार रुपयांची इतिहासात पहिल्यांदाच भर पडली. वार्षिक टेंडरसाठी १३६ अर्ज प्राप्त झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
वार्षिक कामासाठी एकूण तीस प्रकाराच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यापैकी कार्यालयीन कामासाठी छपाई- दोन, विद्युत विभागाच्या दिवाबत्तीसाठी एक व विद्युत विभागाच्या हायमास्ट साठी शून्य अशा तीन कामासाठी थंड प्रतिसाद मिळाला तर पाणीपुरवठा विभागाच्या ब्लिचिंग पुरवठा व तुरटी पुरवठा करणे या कामासाठी प्रत्येकी १४ जणांनी निविदा भरली आहे. त्या खालोखाल आठवडे बाजारात व दैनंदिन वसुलीसाठीच्या कामासाठी १२ जणांनी निविदा भरली आहे. वाढलेल्या स्पर्धेमुळे पालिकेला चांगले उत्पन्न मिळाले आहे.
नळदुर्ग नगरपालिका वार्षिक टेंडर
1. कार्यालयीन कामासाठी स्टेशनरी साहित्य पुरवठा करणे 03 निविदा प्राप्त.
2. कार्यालयीन कामासाठी छपाई - 02
3. संगणक खरेदी दुरुस्ती तत्सम साहित्य- 03
4. सी.सी. टिव्ही कॅमेरा पुरवठा- 03
5. झेरॉक्स- 04
6. चहा, नाष्टा, अल्प उपहार - 03
7. फुल, हार, श्रीफळ- 04
8. फोटो, व्हिडिओ शुटींग डॅमेरा पुरवठा- 04
9. मंडप, स्पीकर, बॅरेकेटिंग, स्टेज- 03
10. जे.सी.बी. पोकलेन- 03
11. खडी, मुरूम पुरवठा करणे -07
12. कुशल कामगार- 05
13. रिक्षा आलाऊसिंग- 03
14. विद्युत साहित्य खरेदी -05
15. विद्युत विभाग दिवाबत्ती-01
16. विद्युत विभाग हायमास्ट- 02
17. स्वच्छता विभाग साहित्य पुरवठा करणे - 05
18. जंतूनाशके व फिनेल- 04
19. जॅकवेल मोटार दुरुस्ती- 04
20. पाणी पुरवठा विभाग साहित्य- 03
21. पाणी पुरवठा विभाग जलवाहिनी- 00
22. कप्पी पुरवठा विंधन विहीर- 03
23 टॅकर पुरवठा - 03
24. ट्रैक्टर दुरुस्ती व बॅटरी व प्रहरी/ सर्व्हिसिंग-6
25. पत्र्याचे शेड मारणे-04
26. ब्लिचिंग पुरवठा करणे -14
27 तुरटी पुरवठा करणे - 14
28. किल्ला गेट पार्किंग -06
आठवडी बाजार दैनंदिन वसूली- 12
30. डंपिंग ग्राउंड मशनरी दुरुस्ती- 03,
इत्यादी प्रमाणे एकुण 136 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.