तलमोड ता. उमरगा येथे श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री. हनुमान जयंतीचे औचित्य साधून तलमोड ता.उमरगा जि. धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे दि. २६ मार्च २०२६ ते १ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे औचित्य साधून श्रीधाम वृंदावन हिंदू महासभा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व कृष्ण जन्मभूमी मथुरा संघर्ष न्यास महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भागवत कथाकार श्री. सोपानदेव महाराज यांच्या सुंदर भागवत कथेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास तलमोड व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून भागवत सप्ताहाची शोभा वाढवावी असे आवाहन तलमोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या श्री हनुमान यात्रा कालावधीत पहाटे चार ते सहा काकड आरती, सहा ते सात श्री ची पूजा व अभिषेक, सात ते साडे अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, बारा ते एक भोजन, दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजे पर्यंत श्रीमद् भागवत कथा, सहा ते सात हरिपाठ, रात्री सात ते आठ भोजन, रात्री नऊ ते अकरा हरी किर्तन, रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत हरिजागर असा दैनदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दरम्यान दि. २६ मार्च रोजी किर्तनकार हभप राजेश पाटील महाराज ( गुंजरगा ) दि. २७ मार्च रोजी हभप सुधाकर महाराज इंगळे ( सोलापूर ) दि. २८ मार्च हभप सोपान महाराज ( अर्विकर ) दि.२९ मार्च हभप कांचनताई शेळके, दि. ३० मार्च हभप गोपीनाथ महाराज जरांगे पाटील, दि. ३१ हभप हरि गुरुजी लवटे ( श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान ) दि. १ एप्रिल रोजी हभप दिनकर महाराज निकम ( मोगरगा ) यांचे किर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे दि. २ एप्रिल रोजी सकाळी श्री श्री जन्म व गुलाल वहाणे व हनुमान चालीसा भजन , महारुद्राभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम , पालखी मिरवणूक व भारुडाचा कार्यक्रम, दि. ३ एप्रिल रोजी श्री चा अभिषेक, महाप्रसाद , हभप विश्वनाथ मोरे ( मळगीकर )पुणेकर यांचे गोपाळ काल्याचे किर्तन , संघ्याकाळी पाच वाजता गोपाळ काला व रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध वाख्याते श्री अविनाश भारती यांचे तरुणांचे प्रबोधन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तलमोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.