नळदुर्ग : भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया जल्लोषाने साजरा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाआरती, श्री रामतीर्थ देवस्थान जीर्णोद्धारचेही श्री विष्णू महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन.
नळदुर्ग,दि.२६ :
भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा तिर्थक्षेत्र रामतीर्थ मंदिरात गुरुवारी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांने साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली . तत्पुर्वी रामनवमीनिमित्त नळदुर्ग शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे.यावेळी रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
श्री राम मंदिर देवस्थानचे महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले होते. "श्री" स अभिषेक करून शृंगारने सजविण्यात आले . अणदूर व नळदुर्ग येथील पालखीचे आगमन झाले. त्यांनतर महाआरती करून उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री रामतीर्थ देवस्थान जीर्णोद्धारचेही भूमिपूजन श्री विष्णू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप महायुतीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, भाजपचे नेते सुशांत भूमकर, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण,माजी सरपंच अशोक पाटील, उद्योगपती मनिष हजारे, नगरसेवक तानाजी जाधव, दत्तात्रय दासकर, पांडुरंग पुदाले, प्रविण गायकवाड, नगरसेविका श्रीमती मिनाक्षी काळे, श्रीमती सुमन ठाकूर, राणी सुरवसे, साहेबराव धुगे , धिमाजी घुगे,किशोर नळदुर्गकर, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, बलभीम मुळे, माजी नगरसेवक सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, श्रीकांत पोतदार, बाबु राठोड ,बलदेवसिंग ठाकुर, संदिप गायकवाड, बबन चौधरी, विनिल जांभळे ,अमोल मेंडके ,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,सुनिल उकरंडे, शिवाजी व-हाडे गुरुजी, स्वप्नील काळे, भिमाशंकर बताले, उमेश नाईक, अजय देशपांडे, सुदर्शन पुराणिक, गणेश मोरडे, किरण दुस्सा, सागर हजारे,अजय भास्कर, अक्षय भोई, सुप्रीया काळे, माधुरी जांभळे ,राखी दुबे, पुजा गायकवाड, सुप्रीया पुराणीक, कार्तिकी दुस्सा आदीसह परिसरातील विविध गावातील राम भक्त उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामतीर्थ, नळदुर्ग येथे भेट देऊन दर्शन घेतले.
समृद्ध धार्मिक वारसा लाभलेले हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असल्याचा विशेष आनंद वाटतो. दरवर्षी हजारो भाविक येथे श्रद्धेने येतात. त्यांच्या सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक विकास निधी तसेच पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास निधीतून टप्प्याटप्प्याने विकासकामे सुरू आहेत. सर्वांच्या सहकार्याने या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साध्य करू.
रामनवमी निमित्त नळदुर्ग येथील संविधान चौकात शिवसेना उबाठाच्यावतीने श्री. प्रभू रामचंद्राच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक मारुती खारवे निवृत्त शिक्षक दत्तात्रय वाघमारे, लष्करे , शिवसेना उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपशहरप्रमुख शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे , चंद्र सगरे, भिमा कोळी, मालू होनाळे, आदी उपस्थित होते. तसेच अणदूर येथून श्री प्रभू रामचंद्राच्या पालखीची मिरवणूक संविधान चौकात आल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.