जि.प.सदस्य सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड
नळदुर्ग,दि.२७ :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषदेचे भाजप महायुतीचे नुतन धाराशिव जि.प.सदस्य सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड करण्यात आली आहे.हे वृत्त समजताच समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थकांतुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सिद्धेश्व्र कोरे हे नंदगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षापासून सरपंच , उपसरपंच, सदस्य म्हणून जनतेची सेवा केल्याचे सर्वश्रुत आहे. गावातीलच नव्हे तर परिसरातील सर्वसामान्य व्यक्तीस काही अडचण आली, गंभीर प्रसंग ओढावला कि ते मदतीसाठी धावून जातात. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष ,उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आज झालेल्या विशेष सभेत चार महत्त्वाच्या सभापती पदांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खराडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) आणि अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.