सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने सत्कार करुन दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
नळदुर्ग,दि.२८:
भाजप महायुतीचे नंदगाव गटाचे (ता.तुळजापूर) जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजप नळदुर्ग शहराचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पत्रकार शिवाजी नाईक ,सुदर्शन पुराणिक यांच्या वतीने नुतन जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांचा नंदगाव येथे त्यांच्या निवासस्थानी शनिवार रोजी शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी परमेश्वर भिमराव चिनगुंडे, गणेश नरे, अप्पाशा कोरे, ख्याम गुड्डे, ,शरद येणेगुरे, परमेश्वर दमाचे, कैलास वाघमारे, तानाजी गुड्डे, शिवानंद कलशेट्टी, अविनाश कुलकर्णी आदींसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.