सर्वसामान्य जनतेच्या आर्शिवादामुळे सभापती पदी निवड;  ग्रामीण विकासाला चालना देण्याकरिता प्रयत्नशिल - नुतन सभापती सिध्देश्वर कोरे ,

नंदगाव येथे जंगी स्वागत करत जल्लोषात भव्य सत्कार 

नळदुर्ग,दि.२९ :


सर्वसामान्य जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवुन मला सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवक नेते मल्हार पाटीलसह जिल्ह्याचे नेतेमंडळीनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असुन पारदर्शी व जास्तीत जास्त विकासाला चालना देणार असल्याचे धाराशिव जिल्हा परिषदेचे नुतन सभापती सिध्देश्वर अण्णा कोरे यांनी नंदगाव या तुळजापूर येथे आयोजित सत्कारा प्रसंगी बोलताना सांगितले.

सिध्देश्वर अण्णा कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मुळ गावी नंदगाव ता . तुळजापूर येथे शनिवार रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच शशिकांत नगिले, ग्रामपंचायत सदस्य धनराज कलशेट्टी,  मल्लिनाथ गुड्डे, सतीश काटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे,
माजी सरपंच भीमराव पिरेषा चिनगुंडे, माजी सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी,  विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन धर्मराव तुपे, माजी उपसरपंच  दशरथ काटे गुरुजी,  प्रतिष्ठित नागरिक शिवानंद शरणार्थी, चिदानंद बशेट्टी, शिवशंकर वाले , संजय सूर्यकांत पाटील, इराण्णा वाले ,  भीमाशंकर करंडे गुरुजी, श्रीशैल कट्टे, देवेंद्र तळणे, सचिन कोरे , सागर चौगुले ,सुरज गुड्डे, प्रशांत येणेगुरे,  महेश सातलगावकर , अमोल स्वामी, आदीसह नागरिक , ग्रामपंचायतचे  कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार सरपंच शशिकांत सांगितले यांनी मानले.

 
 
Top