बालकांना सुरक्षित आरोग्यदायी वातावरण मिळाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल - माजी सरपंच प्रा. ज्योतीका चव्हाण
नळदुर्ग,दि.२९:
आजची बालके हे देशाचे भवितव्य आहेत प्रत्येक बालकाला सुरक्षित आरोग्यदायी वातावरण मिळाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल राहील असे मत माजी सरपंच प्रा. ज्योतीका चव्हाण यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील मानेवाडी, हगलूर येथे हॅलो फाउंडेशन व बाल ग्राम संरक्षण समितीच्या वतीने बाल अत्याचार,बाल विवाह,बाल कामगार,बाल लैंगिक अत्याचार या विषयावर मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित केले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चव्हाण बोलत होत्या.
पुढे बोलताना म्हणाल्या की बालकांना निकोप व योग्य संधी देण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे मुला-मुलीनां प्रोत्साहन मिळेल.
यावेळी ग्रामसेविका अरूणा कदम, बचत गटाच्या अध्यक्षा सिमा नागरगोजे, सीआरपी मैदाबी सय्यद,अ.कार्यकर्त मंदाकिनी जाधव, आशा कोंडाबाई राठोड, प्रेरक अनिल पवार, श्रीदेवी घुगे,हणमंत घुगे, ग्रा.प.सदस्य संजय पवार मानेवाडी येथील मा.सरपंच सुवर्णा सगट, सखुबाई माने,छाया लकडे, सुरेखा हावळे, श्रीदेवी माने,प्रेरिका शुभांगी माने, राहुल हक्के, तानाजी गडदे,हॅलो फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर जाधव, यांच्या सह गावातील विद्यार्थी , विद्यार्थिनी आदि उपस्थित होते.