नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आलियाबाद येथे लोकसहभागातून श्रमदान
जळकोट,दि.२९:
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अनगड दगडी बांध सामाजिक लोकसभागातून श्रमदान करण्यात आले.
यावेळी वैयक्तिक लाभाचे घटक व नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विविध उपचार पद्धती याची माहिती ब्रम्हदेव माने एन आर एम समन्वयक यांनी दिली तर टप्पा - 2 बाबत एस.आर .माने सहाय्यक कृषी अधिकारी यांनी माहिती दिली.
यावेळी लोकसहभाग सामाजिक चळवळ व विविध उपचार पद्धती नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण व लोकसहभागातून शाश्वत विकास याविषयी माहिती घेताना ग्राम कृषी विकास समिती, बचत गटातील महिला सामाजिक क्षेत्रातील नागरिक इत्यादींनी श्रमदान केले . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण ,सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण,ग्रा.प.सदस्या शांताबाई माणिक राठोड, विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, यशवंत राठोड, सिताराम राठोड,व्यंकट राठोड, गणेश चव्हाण, सुभाष चव्हाण, सचिन राठोड, विश्वनाथ चव्हाण, राहुल चव्हाण,ग्राम कृषी विकास समिती मधील सदस्य सविता राठोड, सुरेखा चव्हाण, वंदना चव्हाण, रेखा राठोड, मंगल चव्हाण, पार्वती चव्हाण, कांताबाई राठोड, उमाबाई राठोड अतिश राठोड, संदीप राठोड, मनोज पवार आदी उपस्थित होते.