रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अशोक कदम यांची बालाघाट महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अशोक कदम यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
डॉ अशोक कदम यांनी ३२ वर्ष महाविद्यालयीन सेवेत केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची या पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे ,सदस्य बाबुराव चव्हाण यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, नॅक को अर्डिनेटर डॉ शिवाजी घोडके, गणित विभाग प्रमुख डॉ एन.बी.जाधव, पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.