कु. सृष्टी धनंजय पाटील हिने मिळविले वाणिज्य शाखेतील सर्वोच्च सी. ए.ची पदवी 

नळदुर्ग,दि.०६: डॉ. दिपक जगदाळे

 
 कु. सृष्टी धनंजय पाटील हिने वाणिज्य शाखेतील सर्वोच्च सी. ए.ची पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांची ती  कन्या आहे.


सृष्टी पाटील हिचे प्राथमिक शिक्षण तुळजामाता इंग्लिश स्कूल तुळजापूर येथे झाले असून अकरावी व बारावीचे शिक्षण तिने शाहू महाविद्यालय लातूर येथे पूर्ण केले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण पुणे येथे घेतले असून सद्या ती मास्टर कार्ड या अमेरीकन कंपनीत नोकरी करत आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष सहज संपादन करता येते असे यश प्राप्त करण्यासाठी संयम, सचोटी, अभ्यासातील सातत्य,आणि प्रचंड आत्मविश्वास अंगी असणे आवश्यक आहे. हे सृष्टीने दाखवून दिले आहे. तिच्या या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे संचालक बाबुराव चव्हाण   प्राचार्य डॉ सुभाष राठोड ,उपप्राचार्य डॉ अशोक कदम, नॅक कोर्डिनेटर डॉ. शिवाजी घोडके डॉ. एन.बी. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top