नळदुर्ग शहर भाजप कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त  महिलांचा गौरव

नळदुर्ग,दि.१०:

नळदुर्ग  शहर भाजप कार्यालयात  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा  गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती पाटील, डॉ. माधुरी बाबरे, यास्मिन शेख, धानम्मा कट्टे, अंजुम शेख, अनुषा चव्हाण आणि कोमल देवकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. स्वाती पाटील व डॉ. माधुरी बाबरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे बबन चौधरी यांनी पुढाकार घेतले असून याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके,  अबुअलहसन रजवी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

 
Top