महामार्गावरील बाह्यवळण रस्त्ता पर्यटकांसह वाहनचालकांना गैरसोयीचा, खंडोबा पणन ते मुर्टापाटी पर्यंतचा  रस्ता चालु करण्यासाठी  शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा 

प्रतिकात्मक फोटो 

नळदुर्ग, दि.८ :

ऐतिहासिक नळदुर्ग शहराबाहेरुन बाह्यवळण रस्ता गेल्याने मालवाहतूक व प्रवासी वाहनांना नळदुर्ग शहरात ये जा करण्यासाठी  मोठी कसरत करावी लागत आहे. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता शहरातील जुना राष्ट्रीय महामार्गावरील  खंडोबापणन ते मुर्टापाटी  पर्यंतचा हा रस्ता त्वरित चालु करुन शहरवासियासह प्रवासी वाहन चालकांना दिलासा द्यावे, अशी मागणी  होत आहे.

याप्रकरणी नळदुर्ग शहर शिवसेना उबाठाच्या वतीने धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातुन गेलेला जुना राष्ट्रीय महामार्ग  सोलापुर हैद्राबाद हा नवा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विजयवाडा क्र 62 हा नळदुर्ग बायपासने शहराबाहेरून काढल्यामुळे जुना रस्ता मुर्टापाटी पासुन नळदुर्ग शहरातुन खंडोबा पणन पर्यंत वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. यामुळे नळदुर्ग शहर पर्यटक व औद्योगिक विकासावर विपरीत परीणाम होत आहे. शहरातील उदयोग धंदे बंद पडण्याच्या  मार्गावर आहेत. तर पर्यटक शहरात येत नाहीत. हा रस्ता वळनमागने बाहेरील बायपासला जोडल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. यामुळे गोलाई ते पणन व मुर्टापाटी पासुन बंद केलेला महामार्ग पुन्हा चालु करावा, अन्यथा नळदुर्ग शहर शिवसेना उबाठाच्या वतीने   आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले यांची स्वाक्षरी आहे.


 
Top