जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयात क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप
नळदुर्ग,दि.९:
बुधवार दि. ८ एप्रिल रोजी नळदुर्ग शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यावतीने वैद्यकीय अधिक्षिका डॉ चंचल बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत 2026 च्या आरोग्य दिनाच्या ब्रीदवाक्या प्रमाणेच" एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी" या वाक्याला साजेसे असे नगराध्यक्षांनी क्षयरुग्णांना ६ फूड बास्केट वाटप केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरदास , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाभरात जागतिक आरोग्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ अभिजीत बनसोडे यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत पोषण आहार वाटपाचा दानयज्ञ राबवणे मागील दोन वर्षापासून अखंडपणे चालविला जात आहे. या अभियानांतर्गत गरजू क्षय रुग्णांना सकस संतुलित पोषण आहाराचे वाटप समाजातील दानशूर व्यक्तीकडून मदत घेऊन पुरवले जाते. या आव्हानाला प्रतिसाद देऊन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी फूड बास्केट जागतिक आरोग्य दिनानिमित्त वाटप केले. याप्रसंगी एक आठवण अशी ही होती की मागील वर्षी सदर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी फूड बास्केट क्षय रुग्णांना वाटप केले होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉ चंचल बोडके , वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र मडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रतिनिधी जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने, नगरसेवक तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, पद्माकर घोडके, डॉ सुरेंद्र मडके, डॉ भोरे तालुका क्षयरोग पथक पर्यवेक्षक महेश पाठक , देविदास जाधव व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.