आलियाबाद येथे विश्व बंजारा दिवस मोठया उत्साहात साजरा
जळकोट,दि.९:
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे विश्व बंजारा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
बंजारा विश्व दिवस हा समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा,बोली भाषा, लोककला आणि देशाच्या विकासातील योगदान जगासमोर आणण्यासाठी साजरा केला जातो.आज आलियाबाद येथे बंजारा विश्व दिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी महिलांना आपली संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा , पेहराव यांची जपवणूक ठेवली पाहिजे येणाऱ्या पिढीला बंजारा समाजाचा इतिहास काय आहे हे लक्षात आले पाहिजे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या शांताबाई राठोड, कांताबाई पवार, कमळाबाई राठोड, मोताबाई देविदास चव्हाण,मोताबाई विनायक चव्हाण, बचत गटाच्या सीआरपी जयश्री चव्हाण , हॅलो मेडिकलच्या समन्वय सुरेखा चव्हाण, मंगल चव्हाण, रेखा राठोड , सिद्राम पवार, माणिक राठोड, देविदास चव्हाण, व्यंकट राठोड , शिवाजी चव्हाण, विनोद चव्हाण, तानाजी राठोड, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार गणेश चव्हाण यांनी केले.