जिल्हा परिषद शाळा विलनिकरणाच्या विरोधात नळदुर्गमध्ये  पालक एकवटले ;  रस्त्यावर उतरून आंदोलन

नळदुर्ग,दि.१० :

 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विलिनीकरण करण्याच्या शासन निर्णया विरोधात शहरात निषेध फेरी काढत संविधान चौकात आंदोलन केले.वास्तविक पाहता नळदुर्ग येथील जि.प.के.प्रा.शाळा ही पूर्वी पासूनच मुला-मुलींचे एकत्रिकरण केली गेली आहे.सदरच्या शासन निर्णयात एकाच कॅम्पस मधील जर मुला-मुलींची प्राथमिक व माध्यमिक शाळा वेगवेगळ्या असतील तर त्या एकत्र करण्यात येत आहेत.परंतु ही प्राथमिक शाळा पूर्वी पासून मुला-मुलींची एकत्रित आहे.शिवाय पटसंख्या,गुणवत्ता,शैक्षणिक वातावरण व भौतिक सुविधा चांगल्या आहेत.त्यामुळे पालक या प्राथमिक शाळेकडे वळत आहेत.पण जर हा निर्णय रद्द नाही केला तर पालकांनी आपली मुले इतर खासगी शाळेत पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनास अनेक संघटना,पत्रकार,नागरिक यांनी पाठिंबा दिला असून,आंदोलनास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले,सदस्य प्रमोद कुलकर्णी, कविता कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. पालक वसीम काझी व मूर्तजा शेख,सरदारसिंग ठाकूर यांनी ही मनोगत व्यक्त केले.यावेळी समितीचे सदस्य मारुती वाघमारे,नेताजी महाबोले,गौस बागवान,अबूसलाम शेख,साबिया बागवान,मर्जीना शेख,आलिया शेख,शांताबाई वाघमारे,योगिता डुकरे,संजय डुकरे,भगवंत सुरवसे यांच्यासह पालक  उपस्थित होते.मागणीचे निवेदन मंडळ अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी स्वीकारले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top