नळदुर्ग: कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प व ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद 

नळदुर्ग, दि. ११ :डॉ. दिपक जगदाळे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यास विद्यार्थी व वाचकासह शिक्षण प्रेमींनी प्रतिसाद दिला.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड ,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ अशोक कदम, डॉ शिवाजी घोडके डॉ दिपक जगदाळे, डॉ हंसराज जाधव ग्रंथपाल डॉ. सुभाष जोगदंडे हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना वाचन संकल्प करण्याची शपथ देण्यात आली. आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या वतीने मांडण्यात आलेल्या या पुस्तकांचे प्रदर्शन पाहून त्यांच्या बौद्धिक क्षमतेत निश्चितच वाढ होण्यास मदत झाली आहे. सदरिल ग्रंथ प्रदर्शन दि.११ ते १९ एप्रिल पर्यंत खुले राहणार असून शहरातील वाचक प्रेमिनी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. पी एस गायकवाड, डॉ. तुळशीराम दबडे, डॉ. लक्ष्मण थिटे, डॉ. सावते, डॉ. एस यू मिटकर, डॉ. डॉ यू एन भाले, डॉ. संतोष पवार, डॉ. वाघमारे, विजय सुरवसे , सचिन गायकवाड, हामेद काझी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार डॉ सुभाष जोगदंडे यांनी मानले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top