हभप  तुळशीराम मुळे यांच्या  पुण्यतिथी निमित्त  नळदुर्ग येथील हॉटेल गौरी येथे मोफत पाणपोईचा शुभारंभ 


नळदुर्ग,दि.१२:

 येथील ह. भ. प. कै. तुळशीराम मुळे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त चंद्रकांत मुळे यांनी नळदुर्ग बस स्थानकासमोरील हॉटेल गौरी शेजारी रविवार दि.१२ एप्रिल रोजी अकरा वाजता मोफत पाणपोई सुरू केली.

निवृत्त शिक्षक तथा स्वातंत्र्य सेनानी बलभीमराव मुळे गुरुजी, निवृत्त शिक्षक शिवाजीराव मिटकर व तानाजी जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून व फलकाचे पूजन करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. हभप कै. तुळशीराम मुळे यांनी केलेल्या वारकरी संप्रदायाच्या सेवेबद्दल बलभीम मुळे गुरुजींनी माहिती सांगितली व पाणपोई सुरू केल्याबद्दल चंद्रकांत मुळे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. 

चंद्रकांत मुळे यांच्या वतीने तीनही निवृत्त शिक्षकांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भीमाशंकर बताले, अमोल सुरवसे, भगवंत सुरवसे, शिरीष डुकरे, विजय डुकरे, विशाल डुकरे, सुजित बिराजदार, सागरसिंह हजारे, डी.एम.खाटमोडे, आकाश मुळे आदीजन उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top