डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत  साजरा करण्याचे  आवाहन  :आयपीएस अधिकारी मेघना 

नळदुर्ग,दि.१३:


 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शांततेत व उत्साहात साजरी करुन पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन  आय पी एस अधिकारी मेघना यांनी केले आहे.

नळदुर्ग येथे पोलिस ठाण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयावर  चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय नळदुर्ग शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी संदर्भात मार्गाची पाहणी करण्यात आली. भीमनगर , किल्ला गेट , नळदुर्ग पोलीस ठाणे , क्रांती चौक , ऐतिहासिक चावडी चौक , जय भवानी चौक , शास्त्री चौक , अहिल्यादेवी होळकर चौक , नवी पेठ , डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक , बुद्धनगर , डॉ आंबेडकर नगर मार्गे बुद्ध विहारा समोर विसर्जन करण्यात येणार असल्याचे कमिटीतील सदस्यांनी सांगितले. 

यावेळी लेझीम पथक, आकर्षक शुभेचे दारू काम , झांज पथक ,टिपरी संघासह दि. २६ एप्रिल  रोजी सायंकाळी  मिरवणुकीस  सुरुवात होईल. तसेच  मिरवणुकी रोजी सकाळपासून ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत  शहरातील मदय व्यवसायाचे दुकान बंद राहणार आहे. चोरून मद्य विक्री करणाऱ्या  मालकावर कडक कारवाई  करण्याचा इशारा  आय पी एस अधिकारी मेघना यांनी दिली .

यावेळी नगरसेवक मारुती खारवे, बौध्दाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , जयंती कमिटीचे प्रमुख सुरज कांबळे ,अभियंता अजयकुमार बागडे , राजेश बनसोडे , पत्रकार एस के गायकवाड ,  दिलीप भांगे , सिद्धार्थ सुरवसे , अमोल कांबळे , प्रशांत कांबळे , भैया कांबळे , अमर बनसोडे , राजरत्न बनसोडे , अतुल बनसोडे , प्रकाश बनसोडे आदी उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top