श्री महात्मा बसवेश्वर यात्रे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

नळदुर्ग,दि.१४:

 नंदगाव ता. तुळजापूर येथे  सालाबादप्रमाणे यावर्षीही दि.  १४ ते २४ एप्रिल या कालावधीत श्री महात्मा बसवेश्वर यात्रे निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक  भरगच्च कार्यक्रमाचे श्री बसवेश्वर यात्रा कमिटी , ग्रामपंचायत नंदगाव  यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. विजेत्या स्पर्धकांना, संघाना प्रथम व्दितीय, तृतीय  आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व शेतकरी व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. १४ ते २४ एप्रिल या कालावधीत गड्डा बाजार खरेदी विक्री व पशु प्रदर्शनास प्रारंभ, 
बसव पुराण (सादरकर्ते - शिवकथाकार, कुमार सागर स्वामी महाराज), दि.१८ रोजी सायंकाळी ०७ वा. भव्य दिपोत्सव , रविवार १९/०४/२०२६ पहाटे  ४ वा. श्री बसवेश्वर मंदिरात रुद्राभिषेक व सकाळी १० वा श्री म.नि.प्र. राजशेखर महास्वामीजी, पुरांताच्या व आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्नी पुजन व अग्नी प्रवेश. रात्री ०८ वा. नंदिध्वजाची भव्य मिरवणूक व पहाटे ०३ वा आकर्षक  शोभेचे दारुकाम होणार आहे.

सोमवार २० रोजी ४ वाजता जंगी कुस्ती व महाप्रसाद वाटप, याच दिवशी तीन  अंकी सामाजीक, कौटुंबिक व विनोदी नाटक "सौभाग्य लाभू दे मला" आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि. २१ रोजी सर्व रोग निदान शिबीर (तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट) सकाळी १० ते ०४ पर्यंत होईल. बुधवार दि.२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.रात्री ८ वा. जंगी भारुडाचा जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सभापती सिध्देश्वर अण्णा कोरे, सरपंच शशिकांत नागिले यासह यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवशंकर वाले, उपाध्यक्ष शिवाजी भोसले, परमेश्वर चिनगुंडे, सचिव शिवानंद शरणार्थी,  सहसचिव सिध्दाराम पाटील यांनी केले आहे.

 
Top