तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  उत्साहात साजरी

जळकोट,दि.१५:

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच सुर्यकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी जयंती निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आवाहन केल्या प्रमाणे गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी व कार्यकर्ते यांनी महामानवाच्या पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन केले. यावेळी उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, सिद्राम पवार, हरिदास राठोड, शिवाजी चव्हाण,किरण चव्हाण, मनोज पवार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  आलियाबाद येथे सार्वजनिक वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव आणि आठवणी या पुस्तकाचे वाचन केले.
 
Top