तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत कु. स्वामिनी विद्यानंद घंटे यांची  बिनविरोध निवड

नळदुर्ग,दि.१६:

नंदगाव ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतीच्या 
सरपंचपदी महात्मा बसवेश्वर ग्राम विकास पॅनलच्या कु. स्वामिनी विद्यानंद घंटे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेल्या अडीच वर्षापासून रिक्त होते. उपसरपंचाकडे सरपंच पदाचा पदभार होता. बुधवार दि.१५ एप्रिल रोजी सरपंचपदाच्या पोटनिवडणूकीसाठी कु.स्वामिनी घंटे, पूजा घंटे, छाया भाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यानंतर छाननी मध्ये वरील पैकी दोघींचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी कावळे, नडगिरे यांनी स्वामिनी घंटे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. याप्रसंगी अँड दत्तात्रय घोडके, सचिन कोरे, विश्वजित घंटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील , जिल्हा परिषदेचे  नवनिर्वाचित  सभापती   सिद्धेश्वर (अण्णा)  कोरे आदीसह अनेकांनी नुतन सरपंच कु.स्वामिनी घंटे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
Top