मत्स्य शास्त्र विभाग प्रमुख डॉ समीर पाटील,
डॉ. प्रविण शहाजी भाले यांची निवड
बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील दोन प्राध्यापकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षक संघटना ( BAMUCTA ) च्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मत्स्य शास्त्र विभाग प्रमुख डॉ समीर भिमराव पाटील ( बाभळगांवकर ) यांची बामुक्ठाच्या तालुका कार्यकारिणीवर तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील उपप्राचार्य डॉ. प्रविण शहाजी भाले यांची बामुक्कठाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाली आहे. या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यातील व धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकांची प्रलंबित कामे व अडीअडचणी मार्गी लागणार आहेत. धाराशिव येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ संजय कोरेकर, डॉ अंकुश कदम, डॉ शिवाजी घोडके, डॉ हंसराज जाधव, डॉ. लक्ष्मण थिटे, डॉ. तुळशिदास दबडे आदी उपस्थित होते.